आपल्या सिने दूरचित्रवाणी माध्यमांमध्ये भरपूर चंपू आहेत हे सर्वज्ञात आहे. राज्यातील विभाग, जाती, भाषा, कॉलेज, एकांकिका, इत्यादी च्या बाँडिंग मुळे जवळजवळ सर्व निर्णय घेतले जातात.
गेले ७-८ वर्षे आणि प्रामुख्याने कोव्हिड नंतर एक नवा ग्रुप तयार झाला आहे - स्वामी समर्थ अनुयनींचा.
बरेच कलाकार आणि पडद्यामागील तंत्रज्ञ आता स्वामी भक्ती करतात आणि एकमेकास सहाय्य करताना आढळतात. अर्थात, काम मिळावे ह्या स्वार्थापोटी त्यांनी स्वामी भक्ती सुरू केली असं मी म्हणत नाहीये... त्यांना स्वामी कृपा झाली असेलही कदाचित. आणि काही मंडळी संपूर्णपणे नाथ संप्रदायाची उपासना सुद्धा करतात.
एक सूत्र मला सांगतो की स्वामी समर्थ / नाथ / गुरुदेव दत्त ह्यांची भक्ती करूनही जाती भेद अजुनही होतो. गो फिगर!
असो. देव, भक्ती हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ज्याला ज्या मार्गाने मोक्ष मिळेल, ते प्रत्येकाने करावे.
टिप: जर तुम्ही स्ट्रगल करत असाल, तर देव बदलून बघा...