r/MarathiReads • u/sonarprathamesh • 6h ago
r/MarathiReads • u/TourInternal6555 • Feb 27 '26
शिफारस (Recommendation) मराठी वाचनाची सुरुवात करायची आहे? तर ही पुस्तकं तुमच्यासाठी आहेत.
r/MarathiReads • u/TourInternal6555 • Nov 17 '25
👋Welcome to r/MarathiReads - Introduce Yourself and Read First!
Hey everyone! I'm u/TourInternal6555, a founding moderator of r/MarathiReads. This is our new home for all things related to marathi literature. We're excited to have you join us!
What to Post Post anything that you think the community would find interesting, helpful, or inspiring. Feel free to share your thoughts, photos, or questions
Community Vibe We're all about being friendly, constructive, and inclusive. Let's build a space where everyone feels comfortable sharing and connecting.
How to Get Started
- Introduce yourself in the comments below.
- Post something today! Even a simple question can spark a great conversation.
- If you know someone who would love this community, invite them to join.
- Interested in helping out? We're always looking for new moderators, so feel free to reach out to me to apply.
Thanks for being part of the very first wave. Together, let's make r/MarathiReads amazing.
r/MarathiReads • u/SlightDeparture1531 • 4h ago
प्रश्न (Question) Recommend- nonfiction marathi books
I want to start reading Marathi nonfiction short books(under 300 pages) if possible in the beginning then i will move to bigger books. Please recommend some good books
r/MarathiReads • u/JohnSteinbeckWasGoat • 17h ago
चर्चा (Discussion) जुन्या मराठी कविता वाचायला न समजण्या पलिकडे (incomprehensible) आहेत .
अचानक कविता वाचायची इच्छा झाली. लहानपणी ऐकलेले एक लेखक कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत ह्यांच्या कवितांची सुरुवात केली तर त्या वाचताना इतका अडथळा आला कारण बहुतेक वेळ काही समजलेच नाही. भाषेत कसे बदल होत जातात ही आज समजले. काही उदाहरणे देतोय.
r/MarathiReads • u/Kanhaiya1679 • 4h ago
पुस्तक समीक्षा (Book Review) श्यामची आई | Shyamchi Aai | रात्र अठरावी - स्वावलंबणाची शिकवण | साने गुरुजी
साने गुरुजींच्या श्यामची आई मधील हृदयस्पर्शी प्रसंग – रात्र सतरावी : स्वावलंबनाची शिकवण 🎧
साने गुरुजींच्या श्यामची आई या अजरामर पुस्तकातील एक सुंदर आणि संस्कारक्षम प्रसंग ऑडिओ स्वरूपात ऐकण्याची संधी.
📖 प्रसंग : रात्र सतरावी – स्वावलंबनाची शिकवण
लहानपणी आईने श्यामला दिलेली स्वावलंबनाची शिकवण, तिचे संस्कार आणि त्या आठवणी श्यामच्या मनावर उमटलेला प्रभाव या प्रसंगातून अनुभवायला मिळतो.
कामाच्या धावपळीत पुस्तक वाचायला वेळ मिळत नसेल, तर हा प्रसंग ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल.
🎧 ऑडिओ लिंक :
मराठी साहित्य, साने गुरुजींचे विचार आणि श्यामची आई यांवर प्रेम करणाऱ्यांसाठी हा श्रवणानुभव नक्कीच आनंददायी ठरेल.
तुमच्या बालपणी आई-वडिलांनी स्वावलंबनाबद्दल दिलेली एखादी शिकवण आजही आठवते का?
r/MarathiReads • u/nandkishor_0111 • 2d ago
प्रश्न (Question) मराठी मधील आवडती स्त्री लेखिका कोणती ?
r/MarathiReads • u/albatgalbat • 2d ago
चर्चा (Discussion) राग दरबारी, संजय सर, न्यू एज्युकेशन पॉलिसी इत्यादी इत्यादी
राग दरबारी, संजय सर, न्यू एज्युकेशन पॉलिसी इत्यादी इत्यादी
हुश्श! २०१९ मध्ये घेतलेले ‘राग दरबारी’ आता २०२६ मध्ये वाचून झाले. वाचून झाले याऐवजी ‘ऐकून झाले’ असं म्हणावं, तर त्रिलोक पटेल यांनी छान वाचलं आहे, स्टोरीटेलवरती. स्टोरीटेलवरती खूप साऱ्या मराठी आणि हिंदी पुस्तकांचा खजिनाच आहे. कँडी स्टोअरमधल्या मुलासारखा त्यावरती फडशा पाडण्याचा माझा मनोदय आहे.
श्रीलाल शुक्लांच्या ‘राग दरबारी’वर एवढं सारं लिहून आलं आहे की मी त्याचा परामर्श घेणार नाही. ‘कॅच ट्वेंटी टू’, ‘ॲनिमल फार्म’सारखीच ही एक अति उत्तम व्यंग, सटायर कादंबरी आहे. शिवपालगंज या एका छोट्या शहरामध्ये ती घडते. शुक्लांनी ती १९६४ ते १९६७ दरम्यान लिहिली व १९६८ साली प्रकाशित केली. त्यामुळे ती तशा तुलनेने नवीन भारतात घडली. साधारण स्वातंत्र्यप्राप्तीच्या पहिल्या दोन दशकांत. त्यामुळे कथेवर स्वातंत्र्यलढ्याच्या छटा आहेतच.
मी इथे माझ्या शालेय जीवनातील दोन प्रसंग सांगणार आहे व त्या प्रसंगांवरून श्रीलालजी अजूनही का वाचले जातात, त्याची प्रतीती देणार आहे.
माझे वझे सर. वझे सरांनी आम्हाला प्रत्यक्ष शाळेत कधी शिकवले नाही, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांनी आम्हाला वाचन कसे करावे व शब्दकोश कसा वापरावा यावरती आठवीत सेमिनार घेऊन शिकवले होते. वझे सर ‘ट्रेन द ट्रेनर’ या तत्त्वाचा वापर करून उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्यातील इंग्रजी शिक्षकांना कसे शिकवावे यासाठी सेमिनार घेत असत. ही शिबिरे अर्थातच फुकट व वझे सरांच्या घरीच असायची. शिक्षकांना गार पाणी, गार कलिंगडं खायला असावीत म्हणून वझे सरांनी रेफ्रिजरेटर पण घेतला होता. हा सगळा तुकारामी व्यापार वझे सर, व वझे बाईंची त्यांना खंबीर साथ होती म्हणून, करायचे, हे सांगणे न लगे.
तर त्या काळी, म्हणजे साधारण १९६५ च्या दरम्यान, इंग्लिश व मराठीमध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून एम.ए. केलेल्या वझे सरांनी पुण्यात मिळणाऱ्या नोकरीचा त्याग करून गोव्यात शिक्षक म्हणून येण्यावर भर दिला. त्यांना म्हापसा येथील प्रतिष्ठित शाळांमध्ये ‘राग दरबारी’सारखेच खोट्या सह्या करणे इत्यादी इत्यादी प्रसंगांना सामोरे जावे लागले. आणि अर्थातच त्यामुळे त्यांना नोकरी सोडून दुसरी नोकरी धरणे या गोष्टी कराव्या लागल्या.
आज मला वझे सरांना आणि त्यांच्या त्या काळच्या एकूणच पिढीला नेहरूंच्या “एक बगल में चाँद होगा, एक बगल में रोटियाँ” या ग्वाहीवरती विश्वास होता असे वाटते. तो विश्वास कितपत रास्त होता ते त्या भारतमातेलाच ठाऊक.
माझे संजय सर. संजय सर म्हणजे आमचे मराठीचे सर. त्यांनी पण मराठीमध्ये एम.ए. केलं होतं व त्यांना पेटीवादनाचा फार छंद होता. संजय सर २००० सालीच गेले. रिटायरमेंट बहुतेक नुकतीच सुरू झाली होती आणि ते त्यातच गेले. मी खूप शिकावं, अर्थशास्त्रामध्ये पीएच.डी. घ्यावी अशी त्यांची खूप इच्छा होती. आणि त्याबाबत ते वेळोवेळी माझ्या वडिलांकडे तशी चौकशी पण करायचे.
तर गोव्यातील विकास शिक्षण संस्थेमध्ये सरांना नोकरी करण्यासाठी मोठी देणगी द्यावी लागली होती व सर त्या रकमेची अदाई त्यांच्या जाण्याच्या दिवसापर्यंत करत होते. राष्ट्रकार्य करणाऱ्या शिक्षकाला व्यवस्था भ्रष्टाचाराला आहुती द्यायला लावत होती, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. आणि हे सारे असूनही, फक्त बेरकी नसल्यामुळेच सर विद्यादान करत होते प्रामाणिकपणे. खरोखर उजव्या विचारांचे असते तर त्यांनी छानपैकी आटा चक्की सुरू केली असती किंवा सरळ राजकारणाकडे मोर्चा उठवला असता.
आणि गंमत म्हणजे हा भ्रष्टाचार आपण सिनेमामध्ये बघतो तसा ब्लेटंट भ्रष्टाचार नव्हता. आणि सरकारे आली आणि गेली तरी तो अव्याहतपणे तसाच चालू होता, शांतपणे. कुणीही त्याबद्दल काहीही बोलत नव्हते व कुणाला त्याबद्दल वाईटही वाटत नव्हते.
शुक्लांच्या ‘राग दरबारी’मुळे हे सगळे थोडे आठवले आणि म्हणून मी ते लिहून ठेवले. काही स्मृतीच म्हणा ना.
आता साल २०२६ मध्ये आपल्या भारतामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे. त्यामुळे चित्र बदलले, पोरे शिकतील, भारताची ‘सोने की चिडिया’ परत येईल, असा मला दृढ विश्वास आहे. कारण hope is a good thing.
आणि हे सगळं आठवून द्यायला श्रीलाल शुक्लांसारखा समर्थ लेखक मदत करतो. त्यामुळे त्यांचे आभार आणि त्रिलोक पटेलांचे पण आभार.
धन्यवाद.
https://priyaranjanmarathe.substack.com/p/23c?r=5d03f&utm_medium=ios
https://www.goodreads.com/review/show/9120875376?ref_src=ios_share
r/MarathiReads
•
u/Indianmiles
•
3d ago
चर्चा (Discussion) दिवाळी अंक - २०२६. ✌️✨
प्रत्येक वाचकासाठी दिवाळी सणाच्या आनंदात भर घालणारे साहित्य म्हणजे “दिवाळी अंक”.
दिवाळी अंकातील कथा, लेख, कविता वाचताना मला एक वेगळाच आनंद मिळतो.
यंदाच्या मोसमात हे “दिवाळी अंक” वाचावयास घेतले आहे.
१. माहेर
२. मौज
३. दीपावली
४. जत्रा
तुम्ही कोणता अंक वाचायला घेतला आहे ?? किंवा वाचून पूर्ण केला आहे, त्या अंकाचे नाव आणि अभिप्राय थोडक्यात मांडा. 🙂✌️
r/MarathiReads • u/albatgalbat • 4d ago
चर्चा (Discussion) राग दरबारी, संजय सर, न्यू एज्युकेशन पॉलिसी इत्यादी इत्यादी
r/MarathiReads
•
u/Relative_Dream_8964
•
5d ago
तुमचे मत (Opinion) I want to start this thread to express all our opinions on Suhas Shirwalkar...
I see very less posts about SuShi in this community, so I thought why not me!
For starters I love SuShi so much. I've been reading his books from childhood, my hobby of reading is there because I started reading SuShi. I get it tgat for grownups his writing is too much, sounds too much heroic, too much like south Indian movies, but despite that I love SuShi more than any other writer.
Let me know y'all's opinions.
r/MarathiReads
•
u/nandkishor_0111
•
6d ago
चर्चा (Discussion) व्यंकटेश माडगूळकर यांचे साहित्य माझ्या वाचनातून ✍🏻
2027 हे त्यांचे जन्म शताब्दी वर्ष, त्यांच्या बद्दल लोकसत्ता मध्ये मागील रविवारी छापून आले आहे. मला त्यांचे लेखन खूप प्रिय आहे. कारण त्यांची लेखन करण्याची पद्धत तशी खूपच छान आहे. त्यांचे साहित्य माझ्या आवडीचे. तसे मला आवडणारा साहित्य प्रकार म्हणजे ग्रामीण साहित्य, कारण मी जे जीवन जगलो किंवा आता पण काही अंशी जगत आहे ते त्या साहित्यात मांडलेले असते त्यामुळे मला फार प्रिय. ग्रामीण साहित्यात दोन ऋषी प्रसिद्ध आहेत एक आनंद यादव आणि दुसरे नागनाथ कोत्तापल्ले. आनंद यादवांचे संपूर्ण साहित्य वाचले आहे पण नागनाथ कोत्तापल्ले सरांचे थोडेसे वाचले आहे.
व्यंकटेश माडगूळकर माझ्या परिचयाचे झाले ते सर्वश्रुत बनगरवाडी या कादंबरीमुळे. तशी मराठी साहित्यात रुची असणारे सर्व जण बनगरवाडी वाचतात. तशी मी पण वाचली आणि मला ती परत वाचावी वाटली. ती वाचताना मी स्वतः ते मास्तरांचे आयुष्य जगत होते असे चित्र उभे राहते. कारभारी, अयबू, शेकु माणसासारखी उंच शेकूची पत्नी, अंजी असे एकानं एक जण माझ्या डोळ्या समोर उभे राहिले. मलाही त्याच्या सारखे शिक्षक व्हावे वाटू लागले. आम्हाला 12 वी मध्ये इंग्रजी विषयामध्ये त्या पुस्तकातील अनुवाद होता. जेव्हा पंत सरकार गावामध्ये येतात तेव्हा माझ्या मनाची उत्कंठा वाढलेली असते तसेच, पैसे चोरीला जाणे असो की पडलेला दुष्काळ असो मला दोन्ही वेळी मनाला चिंता निर्माण करणारे लेखन होते त्यांचे.
"सातांतर" ही कादंबरी BBC Earth वरील डॉक्युमेंट्री सारखी आहे ज्यामध्ये एक वनरांच्या टोळीमध्ये सातंतर घडून येते. ज्यामध्ये दोन नर आपल्या वर्चस्वाची लढाई लढत असतात. त्यांना त्यावरून सिद्ध कराचे असते की मीच आता ह्या टोळीचा प्रमुख आहे.
"वावटळ", म. गांधीच्या नंतर उसळलेल्या दंगलीची ही कहाणी आहे कश्या प्रकार दंगल उसळल्या गेली व व्यंकटेश माडगूळकर यांच्या जन्मगावी देखील त्यांच्या गावात त्यांना हा दंगलीचा सामना करावा लागतो, वाटेतील प्रवास, वाटेत लागलेली भूक असे वर्णिले आहे की एकदम डोळ्यासमोर उभे राहते. ह्या दंगलीचे वर्णन आनंद यादव यांच्या झोंबी मध्ये आहे, त्यामध्ये तर खूप भयानक वर्णन आहे.
"करुणाष्टक" व्यंकटेश माडगूळकर यांच्या आईच्या जीवनावर आधारित असलेली कादंबरी आहे. गरिबीतून वर येण्यासाठी धडपडणारी, आशावादी आई, आपल्या सर्वांची असते तशी त्यांची पण. जिद्दीने संसार करणारी आई, मुलांचा सांभाळ तसेच परिवाराचा संसार करणारी आई ह्या मध्ये आहे. लेखकाचे पैसे चोरीला जातात तेव्हा सोने विकायचा सल्ला देणारी आईच असते. कडक शिस्तीची आणि स्वाभिमान जपणारी आई. ह्यावर पर्ण पेठे चे एक नाटक पण आले आहे वाटते जर मी चुकत नसेल तर. गावाकडच्या गोष्टींमधील "काका" कथा तुम्ही नक्की वाचा खूप मजेदार आहे आणि त्यामध्ये लेखकाची आई किती भाबडी आहे हे समजते.
"सिंहाच्या देशात" हा त्यांचा अनुवादित प्रवास वर्णन पुस्तक पण छान आहे आता मला त्याच्यातील बारकावे आठवत नाही आहेत न जुन्या डॉक्युमेंट्री कश्या shoot केल्या जात असत असेच बरेच काही काही आहे त्यामध्ये.
बेळवण, गावाकडच्या गोष्टी, बाजार, तुपाचा नंदादीप, हस्ताचा पाऊस असे खूप काही साहित्य आहे त्याचे नक्की वाचावे. त्यांच्या साहित्यात ग्रामीण जीवन तसेच त्याचे शहरी जीवन आणि खूप खूप काही आहे. आपल्या मराठी ला माईला समृद्ध करणारे खूप लेखक, आपण आवर्जून वाचले पाहिजे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षी मी त्यांना अभिवादन करतो.
आपले मराठी साहित्य खूप समृद्ध आहे किती किती लेखक, लेखिका. ताराबाई शिंदे पासून ते गौरी देशपांडे, वीणा गवाणकर अश्या समृद्ध लेखिका. साने गुरुजी, अण्णाभाऊ साठे, दया पवार, लक्ष्मण गायकवाड, पु ल देशपांडे, न्यायमूर्ती रानडे, राजन खान, राजन गवस, इंद्रजित भालेराव, अरविंद जगताप, मिलिंद बोकील किती किती आहेत मलाच आणखी काही माहीत नाहीत.
परत कधी लिहीन मी मराठी लेखकांन बद्दल.
r/MarathiReads
•
u/buriburisimon10
•
6d ago
तुमचे मत (Opinion) Apurvai
Starting to read Apurvai , i have read vyakti ani valli from pl deshpande earlier. enjoyed it a lot! has anybody else read it? what are your views on it or reviews maybe.
r/MarathiReads
•
u/sillygirlie17
•
7d ago
प्रश्न (Question) दिवाळी फराळ संपला. पण हा फराळ उरला आहे. What’s your go to दिवाळी अंक?
r/MarathiReads • u/albatgalbat • 7d ago
चर्चा (Discussion) नो वकीलपत्र - साने गुरुजी
नो वकीलपत्र
“मेरे राम, मेरे राम, जय जय राम.” लहानगीने हळूच गुणगुणायला सुरुवात केली. आम्ही टेलर स्विफ्टची आणि तिने आमच्या सगळ्या संगीताची चेष्टा करणे हा रोजचा परिपाठ. या पार्श्वभूमीवर हे गुणगुणणे आम्हासाठी जरा वेगळे व स्वागतार्ह होते. आणि याचे कारण अर्थातच नव्या बाजाचे गाणे देणारे ए. आर. रेहमान. नव्या ‘रामायण’ चित्रपटातील त्यांचे ‘जय जय राम’ हे गाणे ती गुणगुणत होती.
गंमत म्हणजे जेवढी लोकांनी रेहमानच्या संगीताची टिंगल केली, तेवढीच नव्या पिढीने या नवीन चित्रपटाची गाणी डोक्यावर घेतली. अकल्पित आणि अर्थातच थोडासा विचार करायला लावणारे!
एखाद्याचे संगीत आवडणे वा न आवडणे हा वैयक्तिक निवडीचा विषय आहे. आणि काल रात्रीपर्यंत भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमध्ये धडधडीत लोकशाही जिवंत असल्यामुळे आपली स्वतंत्र आवड जपणे आणि जोपासणे हा प्रत्येकाचा अधिकार आहेच. पण रेहमानला दिलीप म्हणणे हा कोणता आगोचरपणा?
अशी निंदा फारच खालच्या पातळीवरील वाटते. आणि अजून वाईट म्हणजे रेहमान मनापासून आवडणाऱ्या मला अशी विधाने थोडीशी क्लेशकारक वाटतात. कारण रेहमानची गाणी ऐकून आम्ही मोठे झालो आणि त्यांच्यावरती खालच्या पातळीवरील टीका मला माझ्या घरच्या लोकांवर केलेली टीका वाटते.
याचा अर्थ रेहमानची सर्व गाणी सर्वांनी एका सुराने गावी का? नाही, तसे नाही. कारण तसे केले तर आपण सगळेच एकसुरी आणि बेजोड नाही का होणार?
जसजसे वय थोडेसे वाढते, तसे आपण शहाणे होत जातो. एकूणच पूर्ण शिक्षणपद्धतीचा निकष आणि भर माणसाला कमीत कमी वेळेत चाळीस वर्षांचा शिक्षित, सुसंस्कारित माणूस बनवणे हाच असावा. शहाणपणाची नेमकी महत्त्वाची पातळी म्हणजे मला कुणाचेच वकीलपत्र घ्यायची गरज नाही, याची जाणीव होणे.
अगोदर रेहमानचे उदाहरण दिले. आता अजून एक साने गुरुजींचे देतो व माझा मुद्दा संपवितो.
साने गुरुजी महान देशभक्त होते. ते बहुधा त्या काळातील भारतातल्या फार थोड्या एम.ए. झालेल्या लोकांपैकी एक होते. त्या काळी सुखनैव नोकरी सोडून, समाजसेवा करून, स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन त्यांनी भारताचे अक्षरशः निर्माण केले. आपल्या स्वप्नातला भारत त्यांनी बलिदान देऊन घडविला.
बरे, १९४० च्या दशकात महानायक गांधीजींशी वादविवाद करून, गांधींचा पाठिंबा नसतानाही त्यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी मोकळे केले. आपले दैवत गांधीजींशी मतभेद स्वीकारून दलितांसाठी एवढे काही करणाऱ्या साने गुरुजींना विपुल ग्रंथसंपदा निर्माण करण्यासाठीही वेळ होता.
श्यामची आई, गीता प्रवचने, गोड गोष्टी आणि इतर बरीच ग्रंथसंपदा त्यांनी तयार केली. मराठी भाषेवर व संस्कृतीवर प्रेम करणारी एक पिढी घडवली.
तर नमनाला घडाभर तेल ओतल्यावरती कुणीतरी साने गुरुजींना फदे म्हणावे, मला वाईट वाटावे व मी गुरुजींसाठी भांडावे, याला खरे तर काहीच अर्थ नाही. कारण सत्तर वर्षे उलटून गेली तरी गुरुजी अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत.
आजही त्यांनी शिकवलेल्या सोहराब आणि रुस्तुमच्या गोष्टीने एका इराणियन माणसाशी तुमचा सुखसंवाद घडून जातो. गुरुजींच्या रसाळ वाणीने देशोदेशींची भिंत कधीच ओलांडलेली असते. व अशा गुरुजींना कोणत्याही वकिलाची गरज नसते. कारण गुरुजी नेहमी प्रातःस्मरणीयच असतात व राहतील.
तेव्हा यापुढे—नो वकीलपत्र!
r/MarathiReads
•
u/Upper_Classroom4150
•
8d ago
तुमचे मत (Opinion) Aaj bhet mhanun he pustak milala koni vachlay ka?
r/MarathiReads
•
u/albatgalbat
•
10d ago
चर्चा (Discussion) गीतरामायण - 301th Ramayana
जसजसे आपण गीतरामायण अधिक ऐकत आणि वाचत जातो, तसतसे गदिमांना ‘आधुनिक वाल्मीकी’ का म्हणतात, ते उमगत जातं. माझ्यासाठी गीतरामायण हे ‘३०१वे रामायण’ नक्कीच!
गीतरामायण — गदिमांच्या संकेतस्थळावर:
https://www.gadima.com/category/4/0/0/geetramayan-akashwani
याच निमित्ताने वाचण्यासारखा ए. के. रामानुजन यांचा निबंध — “Three Hundred Ramayanas: Five Examples and Three Thoughts on Translation”.
मूळ इंग्रजी निबंध:
https://www.trans-techresearch.net/wp-content/uploads/2015/05/three-hundred-Ramayanas-A-K-Ramanujan.pdf
हिंदी अनुवाद — संजीव कुमार:
https://jankipul.com/blog-post_25-10.html
हिंदी PDF — अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या संग्रहात:
https://anuvadasampada.azimpremjiuniversity.edu.in/3891/1/तीन%20सौ%20रामायणें.pdf
मराठीत — निबंधातील उतारा आणि त्यावरील अवधूत डोंगरे यांचे भाष्य:
https://ekregh.blogspot.com/2024/02/blog-post.html
r/MarathiReads • u/Kanhaiya1679 • 14d ago
पुस्तक समीक्षा (Book Review) श्यामची आई | रात्र चौदावी - श्रीखंडाच्या वड्या | साने गुरुजी
🙏 सप्रेम नमस्कार!
📖 साने गुरुजी लिखित अजरामर साहित्यकृती – 'श्यामची आई'
रात्र चोदावी - श्रीखंडाच्या वड्या👇
https://youtu.be/Dzy6aFdUSw4?si=0hAiWwxtaVPVoWGN
आईच्या प्रेमाची, संस्कारांची, त्यागाची आणि ममतेची हृदयस्पर्शी कहाणी म्हणजे श्यामची आई!
या पुस्तकातील तेरा रात्रींचे वाचन मी ऑडिओ बुकच्या स्वरूपात YouTube वर सादर केले आहे.
🎧 श्यामच्या आठवणी, आईचे प्रेम, तिचे संस्कार आणि जीवनमूल्ये अनुभवण्यासाठी हे तेरा भाग नक्की ऐका.
🔗 'श्यामची आई' –
https://youtu.be/Dzy6aFdUSw4?si=0hAiWwxtaVPVoWGN
🙏 आपण स्वतः ऐका आणि आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक व कुटुंबीयांनाही ही लिंक आवर्जून शेअर करा.
आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ही अनमोल शिदोरी प्रत्येकापर्यंत पोहोचू दे!
धन्यवाद! 🙏
r/MarathiReads • u/raven4shadow • 16d ago
शिफारस (Recommendation) Marathi book recommendations on Sant Tukaram Maharaj translated into English
Namaskar!
I'm looking for book recommendations on Sant Tukaram Maharaj preferably books originally written in Marathi or based on Marathi literature that are available in English translation...
A friend of mine from Delhi is interested in learning about Sant Tukaram Maharaj his life, teachings, philosophy, and contributions to the Bhakti movement... Since my friend isn't familiar with Marathi I'm looking for good English translations that can help them understand his work and thoughts...
I'd especially appreciate recommendations for:
- Collections of Tukaram Maharaj's Abhangas translated into English...
- Books about his life, philosophy, and teachings...
- Reliable translations that retain the original meaning and cultural context...
If you've read any such books, please share the title, author/translator, and your thoughts on them...
Dhanyavaad!
r/MarathiReads • u/aminivi-1 • 19d ago
प्रश्न (Question) कोणी वाचले आहे का ?
२०१६ collection at the age of 16
It’s been 10 years !! 🫡
I am amazed about the type of book I used to read !!
r/MarathiReads • u/JackedNerd13 • 21d ago
पुस्तक समीक्षा (Book Review) Das Dongri Rahato Part 1 Spoiler
A guy named Narayan, cursed with curiosity at a time when curiosity is not rewarded but rather looked at as a negative trait.
You are not supposed to challenge God. But you are not challenging Him; you are just asking why.
But you can't push through this with your widowed mother. People talk. They complain to your mother that her kid asks too many questions.
Why does the sun set in the west? Where do the stars go during daylight?
"That's God's plan."
But you never planned to defy God. You are just curious. But you know your itch for curiosity will never go away.
In that mental quarrel, your mom insists that you get married and makes you promise her that you will not do anything funny until the sacred vows are done.
You follow.
You run the moment those vows are done and keep running. You don't look back. You would rather leave your family behind than kill your curiosity.
You run, run, keep running. You are just a kid. People keep asking questions, so you wear orange clothes. Now people think you are just a sadhu.
You reach your destination, almost more than 200 km away, and go straight to God.
Ask Him all the questions you have. Because everyone told you God has answers. And you realise the hard way that God will not give you any until you earn them.
Wow.
All this effort to realise God will not give you an answer. The answer to satisfying your curiosity lies in finding it yourself. No one is going to help you with that.
Now you start with brutal book reading.
You stand in the river so no one disturbs you and think and think.
And at night, a few people start coming to you with their problems. A few turn into a few hundred, and you see the pattern.
People have a habit: anything bad happens to them, they come crying to God.
You keep telling them that God helps those who try for themselves.
You are the only monk around the corner who gives different answers, not some magical powder or a chanting ritual to make problems go away.
If your wife was abducted, why didn't you try to fight back?
If your crops were burnt, why are you sitting here? Try again next year.
If your child is sick, take him to the doctor. Why are you here?
People love you, but you see a brutal reality. Society has lost its hope. They think only some magical power can save them.
Now you are not curious anymore. You are worried about society.
You realise you have to do something more than individual counselling to uplift the whole society. But you don't know how.
It's frustrating.
And one night, you run again and don't look back. Now you travel farther. You plan to observe not just one town but the whole country in search of one answer:
HOW do you bring hope back to society?
r/MarathiReads • u/Kanhaiya1679 • 23d ago
पुस्तक समीक्षा (Book Review) आई म्हणजे प्रेम, संस्कार आणि त्याग यांचा सुंदर संगम! ❤️ साने गुरुजींची अजरामर साहित्यकृती 'श्यामची आई' आता ऑडिओ बुकच्या माध्यमातून ऐका.या भागात ऐका रात्र - अकरावी भूतदया.
r/MarathiReads
•
u/Interminable_1904
•
26d ago
आजची ओळ (Quote) PL ✨️♥️
कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या न्हवत्या !!
व्यक्ति आणि वल्ली (चितळे मास्तर).
r/MarathiReads
•
u/inner_mind_of
•
26d ago
शिफारस (Recommendation) Stories by अप्पासाहेब खोत
Any one read stories by appasaheb khot i mean ... मरणादारी कोंबडी आणा घोळ गैदरिंग चा पाहुणा if uh haven't try once one of the best stories i have ever read if you can't find book uh can get audio on youtube ....give it a try